संग्राम बापू भंडारेंवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करावी अन्यथा…. महायुती आक्रमक

संगमनेर(DSNews24) संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहमध्ये हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले तरी अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केली नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रांतअधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत मागणी केली.

दहा तासाच्या आत त्या हल्लेखोरांना अटक केली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल त्यामुळे होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला.

हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांचे घुलेवाडीमध्ये कीर्तन सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या अर्ध्या मिनिटात आफझल्याला ठोकला असे विधान केले होते.त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे स्वीयसहाय्यक व त्यांच्या समर्थकांनी भंडारे महाराजांचे कीर्तन बंद पाडून अंगावर धाऊन जात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच गाडीची तोडफोड केली.याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दोन ते तीन दिवस उलटून गेले तरीअद्याप सुद्धा त्या हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते.त्यांनी एकत्रित येऊन प्रांतधिकारी अरुण उंडे व संगमनेर शहर पो नि रवींद्र देशमुख यांना निवेदन दिले. गुन्हा दाखल होऊन दोन ते तीन दिवस झाले तरी हल्लेखोरांना अटक होत नाही त्यामुळे ते गावात राजेरोसपणे फिरत आहेत. त्यांना तुम्ही अटक का करत नाही असा सवाल पोलीस प्रशासनाला करत चांगलेच धारेवर धरले.

संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना घुलेवाडी येथे हिंदुत्ववादी कीर्तन कार संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा असे निर्देश दिले त्या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी आश्वासन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिले

Leave a Comment