विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थींनींनी बुद्धीबळ स्पर्धेत मारली बाजी, पटकावला प्रथम क्रमांक

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी प्रशालेतील इयत्ता आठवीच्या कु. श्रावणी तुषार आमले आणि कु. अदिती अतुल पेंडभाजे या विद्यार्थ्यांनींनी तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन मिळवलंय.

तसेच या दोघींची थेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली. या विद्यार्थ्यांनींनी मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे साकूर पठार भागातून पहिल्यांदाच बुद्धीबळ खेळात विद्यार्थीनींनी यश संपादन केले. तसेच श्रावणी आणि अदिती यांच्या या यशामुळे शाळेची मान उंचावली आहे

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पा. खेमनर, उपाध्यक्ष शंकरराव पा. खेमनर, सेक्रेटरी भाऊसाहेब सागर, सर्व संचालक मंडळ, रजिस्ट्रार हेमचंद्र होळकर सर, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, इन्चार्ज कोळेकर सर तसेच शाळेचा क्रीडा विभाग, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत श्रावणी आणि अदिती या दोघींना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment