शुक्रवारी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिल महिन्याच्या शवेटच्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 48 तासांत विदर्भातील अनेक शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर सांगली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत वादळी वार्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
