राज्याच्या राजकारणात आणि नेत्यांमध्ये सध्या चलबिचल पाहायला मिळत आहे. अजित पवार मुख्यमंत्री असे पुण्यात शुक्रवारी पोस्टरही झळकले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर खोचक टोला लगावला आहे.
एकेकाळी राष्ट्रवादी ला जास्त जागा मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही. आघाडीचं सरकार एकमेकांच्या पायात पाय गुंतून पडलं असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांना लगावला.
भविष्यात कधी दहा वीस वर्षात त्यांना बहुमत जर मिळालं तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं दानवे यांनी बोलताना म्हटलं.
पहिल्या दिवसापासून आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार होतो त्यामुळं सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही. शिंदे गटाच्या आमदारांसाठी सरकारी यंत्रणा वापर झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आघाडीचं सरकारच एकमेकांत पायात पाय गुंतून पडलं असंही यावेळी बोलताना ते म्हणाले.
