गहिवरलेले मन, पाणावलेल्या डोळ्यांनी जाचकवाडी येथील आदर्श शिक्षकांना दिला निरोप

अकोले तालुक्यातील पठार भागातील जाचकवाडी गावच्या आदर्श डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून आदर्श दत्तात्रय गोपाळे व राजेंद्र ढेरंगे या शिक्षकांची बदली झाली.शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी त्यांचा निरोप समारंभ शनिवार दि.१३ सप्टेबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित केला होता.यावेळी गहिवरलेले मन,पाणावलेल्या डोळ्यांनी आदर्श शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ भावुक झाले.

सन २०१८ रोजी शिक्षक राजेंद्र ढेरंगे व सन २०१९ रोजी शिक्षक दत्तात्रय गोपाळे हे जाचकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर रुजू झाले.यावेळी या शाळेत गावातील केवळ १७ विद्यार्थी पटसंख्या होती.गावातील अनेक विद्यार्थी इंग्लिश मेडीयम शिक्षणासाठी बाहेरगावी जात होती.अशा परिस्थितीत या दोन्ही आदर्श शिक्षकांनी विद्यार्थी पालकांना व ग्रामस्थांना विश्वासात घेउन विद्यार्थ्यांचे अंगी कला,शिस्त,गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण सुरू करत १७ विद्यार्थी पटसंखेवरून आज निरोप घेताना अखेर शाळेचा विद्यार्थी पट ४५ वर नेऊन ठेवत ग्रामस्थ पालकांच्या विश्वासपात्र झाले.पालकांना पाल्याच्या शिक्षणासाठी लागणारा अतिरिक्त खर्च देखील त्यांनी वाचवला.

यादरम्यान एक नंबर रजिस्टर लॅमिनेशन असणारी शाळा म्हणून देखील मान मिळविला.शाळेची जीर्ण झालेली इमारत असताना शाळेचं कौलरू छत पूर्णपणे गळत होते.यावेळी गावातील पालक,ग्रामस्थ, मुंबईकर पुणेकर मंडळाचे सहकार्यातून व तरुणांच्या मदतीने ३ लाख ७५ हजार रुपयांची मदत गोळा करत शाळेच्या इमारतीचा जीर्णोध्दार केला.

आदर्श शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मंथन,लक्षवेध परीक्षेत येथील विद्यार्थी जिल्हा,राज्य पातळी पर्यंत पोहचवली.विद्यार्थ्यांचे जादा तासाचे नियोजन करून इ.१ ली, इ २ री साठी शब्दबाग अंकलिपी व इ.३ री व इ.४ थी साठी लर्न इंग्लिश पुस्तकचा वापर करून गुणवत्ता वाढविली. इ.३ री व इ. ४ थीचे विद्यार्थी इंग्रजीत भाषण करू लागली.सन २०१९ रोजी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्याचे कला,गुण पाहून तालुक्याचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी शाळेचे बंदिस्त वॉल कंपाउंडसाठी १५ लाख रुपये मदत करत हेही काम मार्गी लावले.गावातील एका उद्योगपती तरुणांनी गार्डन लॉन्स बनविले.शाळेतील इतर छोटे मोठे बांधकाम करून शाळेचे एक नवे रूप साकारले.

आज शाळेत गावकऱ्यांच्या मदतीने आंबा,नारळ, विविध फुलझाडे, पारस बाग बनविली.शाळेच्या भिंतीवर चित्र, वाचनाचे चार्ट बनवत बोलक्या भिंती बनविल्या आहेत.सन २०२४_२५ कालावधीत माझी मुख्यमंत्री स्वछ व सुंदर शाळा म्हणून अकोले तालुक्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवत शाळेला ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळवून दिले.

विद्यार्थ्यांवर आई, वडिलांन प्रमाणे प्रेम करत शिक्षण देत होते.ग्रामस्थांची शाळेसाठी असलेली तळमळ व शिक्षकांची आदर्श कामगिरी पाहून क्रीडा विभाग अहिल्यानगर यांनी या डिजिटल जिल्हा प्राथमिक शाळेस ७ लाख रुपयांचा क्रीडांगणासाठी निधी दिला.संपुर्ण गावाने माझी शाळा आदर्श शाळा असे मनात बाळगत आजतागायत २३ लाख रूपये लोकवर्गणी व लोकसहभागातून एखाद्या कॉलेजच्या कॅम्पसला देखील लाजवले असा मराठी शाळेचा कॅम्पस तयार झाला.दान, कष्ट व श्रमदान करत शाळेत नवक्रांती घडवून आणत जिल्ह्यातील पहिली डिजिटल जिल्हा प्राथमिक शाळा आदर्श शिक्षकांच्या मदतीने साकारली गेली आहे.

आजही या शाळेची १ लाख ५० हजार रुपये बँकेत कायम ठेव आहे.त्या पैशातून येणाऱ्या व्याजावर विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येते.अक्षर भारती संस्था पुणे,अप्रोच हेलपिंग हॅन्ड रोटरी क्लब पुणे यांनी शाळेची निवड केली.प्रत्येक वर्षी सदर संस्था विद्यार्थ्यांना शालेय दप्तर,पुस्तक,वह्या, पेन,पेन्सिल असे साहित्य वाटप करतात.त्यामुळें या शाळेत आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पालकांना एक रुपयांचा खर्च होत नसल्याने ग्रामस्थ देखील या आदर्श शिक्षकांच्या कामगिरीवर खुश होते.आज ही शाळा एक आदर्श शाळा म्हणून तालुक्यात नावारूपाला आली आहे.यामध्ये आदर्श शिक्षक गोपाळे व ढेरंगे यांचे मोलाचे योगदान आहे.यामध्ये केंद्रप्रमुख पवार,विस्तार अधीकारी अण्णा ठुबे, गट शिक्षण अधिकारी कुमावत यांचे सहकार्य शाळेसाठी लाभले आहे.

या दरम्यान गोपाळे यांची ब्राह्मणवाडा ता,अकोले येथे व ढेरंगे यांची म्हसवंडी ता.संगमनेर येथे बदली झाली. त्यांचे जागेवर महिला शिक्षक उकिर्डे व आरोटे यांची नियुक्ती झाली आहे.यावेळी ग्रामस्थांनी जेवणासह मोठा निरोप समारंभ आयोजित केला दोन्ही शिक्षकांनी शाळेसाठी प्रत्येकी ११ हजार रुपयांची देणगी देत शाळेचा निरोप घेतला आहे.यावेळी माजी सरपंच शिवनाथ हुलवळे, योगेश महाले, महेंद्र फापाळे, देवराम महाले,दिनेश फापाळे, मा.पो.पाटील शिवाजी फापाळे, तान्हाजी हुलवळे, सतीश फापाळे, रमेश हुलवळे, सतीश हुलवळे ,संतोष फापाळे, शशिकांत फापाळे,रसिका फापाळे,मोनिका हुलवळे ,विशाखा रेपाळे, हौसाबाई फापाळे,अर्चना हुलवळे आदी ग्रामस्थ महिला पालक उपस्थित होते.

Leave a Comment