मेष : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. महत्त्वाची वार्ता समजेल.
वृषभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
मिथुन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढेल.
कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आत्मविश्वास वाढेल.
तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
