Weather Alert : नगर, पुणे जिल्ह्यात हवामान विभागाचा मोठा इशारा, येत्या दोन….

Weather Alert : राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवसांत मेघ गर्जनेसह, मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात या वर्षी अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघ गर्जनेसह, गारपीटीची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment