संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठारभागातील मांडवे, शिंदोडी, रणखांब, हिवरगाव व जांबुत या भागातील विद्यार्थ्यांना साकूर येथे शाळा व महाविद्यालयात येण्या-जाण्यासाठी वाहनांची सोय नसल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
या भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी सकाळी, दुपारी व संध्याकाळी अशा 3 शालेय फेर्या साकूर-शिंदोडी, साकूर-रणखांब, साकूर-हिवरगाव व साकूर-जांबुत अशा 3 लोकल तसेच शालेय फेर्या संगमनेर आगाराच्या बसेसने साकूर येथुन कराव्यात अशी मागणी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख ॲड अमित धुळगंड यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचेकडे केली.
या मागणीची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने दखल घेत संगमनेर आगारव्यवस्थापक श्री.प्रशांत गुंड यांना सुचना केल्या. यानंतर रऊफ शेख व अॅड.अमित धुळगंड यांनी आगारप्रमुख गुंड याची भेट घेतली असता त्यांनी देखील लगेचच यासंबंधी कार्यवाही करत असल्याचे आश्वासन दिले आहे.
