बिग ब्रेकिंग! शरद पवारांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीत राजकीय समीकरणं झपाट्याने बदलू लागली आहेत. अशातच परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी परळी नगरपरिषदेत विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून, परळीत शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढली आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड तसेच पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, परळीतील नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे. यामुळे दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे

Leave a Comment