BIG BREAKING ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या कथित गुन्ह्यांबद्दल मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने हसीना यांना तीन गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवलं. गतवर्षी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावर प्राणघातक कारवाईचे आदेश दिल्याबद्दल सुरु असलेल्या खटल्याचा निकाल देताना त्यांना दोषी ठरवण्यात आलं. याच आंदोलनामुळे त्यांचं अवामी लीग सरकार कोसळलं होतं.

न्यायाधीश मोहम्मद गोलम मोर्तुझा मजूमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय न्यायाधिकरणाने हसीना यांचे दोन सहकारी माजी गृहमंत्री असदुज्ज्झमान खान कमाल आणि माजी पोलिस प्रमुख चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांच्याविरुद्धही याच आरोपांवर निकाल दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, तीनही आरोपींनी देशभरातील आंदोलकांची हत्या करण्यासाठी मारण्यासाठी एकमेकांशी संगनमत करून अत्याचार केले.

हसीना आणि कमाल यांना फरार घोषित करण्यात आलं आहे, त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्यात आला. तर मामूनवर सुरुवातीला प्रत्यक्ष खटला चालवण्यात आला आणि नंतर तो साक्षीदार बनला.

न्यायालयाने काय म्हटलं?

हसीना सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी तत्कालीन पंतप्रधानांनी आंदोलनाला कमकुवत केलं आणि विद्यार्थ्यांकडे बोट दाखवून त्यांना ‘रझाकार’ असं संबोधत अपमानजनक टिप्पणी केली, असं न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर शेख हसीना यांनी निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठार कऱण्याचे आदेश दिले असं न्यायालयाने सांगितलं.

न्यायाधीशांनी नमूद केलं की सरकारी वकिलांच्या साक्षीदारांनी हे सिद्ध केलं की ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ला छात्र लीग आणि युवा लीगसह अवामी लीगच्या शाखांनी केला होता.

हसीना यांच्यावर आरोप

हसीना, कमाल आणि मामून यांच्यावर खून, हत्येचा प्रयत्न, छळ आणि इतर अमानवी कृत्यांसह पाच आरोप होते. एका प्रमुख आरोपात हसीना यांनी निदर्शकांना संहार करण्याचा आदेश दिल्याचा दावा होता. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या जनआंदोलनाच्या मागे विद्यार्थ्यांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे करणे आणि प्राणघातक शस्त्रे वापरण्याचे निर्देश दिल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार कार्यालयाच्या अहवालात असा अंदाज आहे की 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान “जुलै उठाव” दरम्यान 1400 लोक मारले गेले कारण त्यांच्या सरकारने व्यापक सुरक्षा कारवाईचे आदेश दिले होते.

5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावावर प्राणघातक कारवाईचा आदेश दिल्याबद्दल खटल्याला सामोरे जाण्याच्या न्यायाधिकरणाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यानंतर 78 वर्षीय हसीना सध्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी निदर्शनांदरम्यान झालेल्या कथित अत्याचारांचे “मास्टरमाइंड आणि मुख्य शिल्पकार” म्हणून हसीनाचे वर्णन केले आहे. तथापि, त्यांचे समर्थक आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा सांगत आरोप फेटाळून लावत आहेत.

Leave a Comment