संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील संगमनेर ते साकूर रस्त्यावरील लहळयीच्या घाटात मालवाहतूक ट्रक पलटी झाल्याची घटना वार – मंगळवार दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडलीय. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली.
अधिक मिळालेली माहिती अशी की, संगमनेरहून साकूर मार्गे सरकी पेंडने भरलेला मालवाहतूक ट्रक केडगाव चौफुलीकडे जात होता. हा मालवाहतूक ट्रक रणखांब फाट्याच्या पुढे असेलेल्या लहळयीच्या घाटात मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आला असता अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाला. यावेळी दोन पलटी या ट्रकने घेतल्या होत्या. ट्रकमधील सरकी पेंडच्या बॅगा देखील अस्ताव्यस्त पडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
