नगरपालिका निवडणुक ; “या” पक्षाच्या उमेदवाराच निधन

नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रभाग क्रमांक १०-अ मधील उमेदवार आणि गायकवाड चौक परिसरातील रहिवासी नितीन वाघमारे (वय अंदाजे ५०) यांचे सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नितीन वाघमारे हे मनमाडमधील ज्येष्ठ आणि सक्रिय शिवसैनिक म्हणून परिचित होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अचानक जाण्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

नितीन वाघमारे यांच्या आकस्मिक निधनामुळे प्रभाग क्रमांक १०-अ मधील निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेनुसार आता ठाकरे गटाला या प्रभागात नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे किंवा ती जागा रिकामी राहील

Leave a Comment