मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढेल.
कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
तूळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
वृश्चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल.
धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
मकर : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कुंभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मीन : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
