नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिला ठार

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आलीय. बिबट्याच्या हल्ल्यात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळ मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी सुमारे ४ वाजता शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय ७०, रा. किन्ही, ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, भागूबाई या आपल्या शेतात एकट्याच काम करत होत्या. अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पोहोचू शकले नाही आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पारनेर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली

Leave a Comment