साकूरमध्ये अभिषेक कृषी दूकानाचा शुभारंभ 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) कृषी व्यावसायात अग्रेसर असलेले संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मल्हारी सोन्नर यांच्या नवीन अभिषेक कृषी उद्योग समूहाच्या दूकानाचा शुभारंभ झाला आहे. या दूकानाचे उद्घाटन मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब पा. खेमनर, भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर, राजहंस दूध संघाचे माजी संचालक पांडुरंग सागर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पा. खेमनर, रामदास धुळगंड सर, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सागर, व्हा. चेअरमन कैलास गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र खेमनर, बंटीशेठ बिर्याणी चे योगेश खेमनर, उत्तम कुदनर, रामशेठ ढेरंगे, मांडवे ग्रामपंचायतीचे सदस्य तुषार धुळगंड, माजी चेअरमन रूपेश धुळगंड, सचिन खेमनर, लक्ष्मण कुदनर, विठ्ठल भागवत आदि मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान मल्हारी सोन्नर यांचं कृषी व्यवसायात मोठं नाव आहे. पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे अभिषेक कृषी उद्योग समूहा अंतर्गत दूकान आहे. यामध्यमातून ते शेतकऱ्यांना उत्कृष्ट सेवा देत आहे. साधारणपणे २००५ पासून ते कृषी व्यवसायात उतरले आहे. त्यांचा चिरंजीव अभिषेक देखील उच्चशिक्षित असून कृषी च शिक्षण घेत ट्रेनिंग घेतले आहे. त्यामुळे त्याचा देखील सखोल अभ्यास झाला याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

मात्र मल्हारी सोन्नर यांनी नवीन अभिषेक कृषी दूकानाचा शुभारंभ केल्याने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment