चिंता मिटणार.. तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

मुंबई – पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या मान्सूनच्या नव्या अंदाजानुसार राज्यात 22 जून, 23 जून आणि 24 जून या तीन दिवसांच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे, राज्यातील अनेक भागांमध्ये या काळात पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांच्याकडून वर्तवण्यता आला आहे. शेतकऱ्यांनी चिंता करण्याचं कारण नाही, येत्या 22 जूनपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल आणि हळुहळु 30 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल असंही पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. पावसाला पूर्व विदर्भातून सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान यंदाच्या पवासावर अल निनोचं सावट आहे, त्यामुळे देशासह राज्यात यावर्षी कमी पाऊस पडेल, मान्सून सरासरीच्या 90 टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. यंदा पाऊस लांबल्यानं पेरण्यांचा खोळंबा झाला असून, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. आता लवकरच राज्यात पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment