मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढेल.
तुळ : एखादी गुप्त वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : हितशत्रुंवर मात कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मीन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
