मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह : राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
धनु : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मकर : नवीन परिचय होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल
