मुंबई : अरबी समुद्रातील उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आजपासून ११ मेपर्यंत कोकणासह राज्याच्या विविध भागात कमाल तापमानाचा पारा चढा राहील.
दरम्यान, ९ ते ११ मेदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, वाशीम, जालना, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर या भागांत मान्सूनपूर्व पावसासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि गोव्यात ७ ते ११ मेदरम्यान उष्णता वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरील अॅटिसायक्लोन पुढील आठवड्यात कमी होण्याआधी कोकण किनारपट्टीवरही तापमानवाढ अपेक्षित आहे
