भाजपात गेल्यापासून डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झालाय..कुणी केली टीका

मुंबई – ट्र्म्प यांच्या बद्द्लची टीका आणि मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू खराब झाला यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सांगितलं आहे की, आता काय ट्र्म्प येऊन रस्त्यांचं काम करणार आहेत का? फोडून फोडून खापर तुम्ही कोणावर फोडलं. कमीत कमी तुमच्या सरकारवर तरी फोडायचं होतं? असा सवाल केला.

तसं पाहिलंतर राजकारणात आले म्हणून त्यांचा मेंदू खराब झाला नाहीतर भाजपात आल्यापासून त्यांचा मेंदू खराब झाला आहे. भाजपा सोडा.. विरोधात या..एकत्रित मस्तपणे लोकांच्या हितासाठी काम करू. भाजपात काहींचा मेंदू खराब झाला आहे. त्यांचा मेंदू दुरूस्त करायचा असेलतर बरोबर काम करू.अजूनही वेळ गेली नाही असे सांगण्यासही पवार विसरले नाहीत.

Leave a Comment