नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर एक ट्रक खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ड्रायव्हर जागीच ठार झाला. या अपघातात सुदैवाने ट्रकचा क्लिनर बचावला.
याबाबत थोडक्यात समजलेली माहिती अशी की, नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील माणिकपीर बाबाच्या अवघड वळणावर नगरकडून खताच्या गोण्या घेऊन येणारा ट्रक (नं. एम.एच.-09-बीसी-7772) आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान करंजी घाटातील या अवघड वळणावरून खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर जागीच ठार झाला.
