भाजपच्या नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांनाच मैत्रीची खुली ऑफर दिल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. बरं ही मैत्रीची दारं किलकिली करणारे नेते कुणी साधे-सुधे नसून एका मोठ्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना मैत्री ऑफर दिली आहे. मोदी@९ महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या मनात काही विचार असतील त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी. भाजपचे दरवाजे बंद नसतात, आमच्या पक्षाची दारं कायम खुलीच असतात.
मात्र उद्धव ठाकरेंना पुढाकार घ्यावा लागेल, भाजप प्रस्ताव ठेवणार नाही, कारण त्यांनी चूक केली आहे, भाजपने चूक केलेली नाही.” असं वक्तव्य केशवप्रसाद मौर्य यांनी केलं आहे.
