आता बिग बॉस मराठी 1ची विजेती प्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडे हिनं भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. अभिनेत्रीनं आज रितसर भाजपमध्ये एंट्री घेतली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मेघाबरोबरच टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा असलेला अभिनेता सौरभ गोखलेनं देखील भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.
या पक्षप्रवेशावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , महामंत्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रिया बेर्डे उपस्थित होत्या.
