पुणे-नाशिक महामार्गावर मोठा अनर्थ टळलाय. नारायणगाव जवळ एसटी बसचा स्टेअरिंग फ्रीज झालां. सत्तरहून अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात होता.
महामार्ग सोडून एसटी खाली उतरली होती. पुढं मोठा खड्डा होता. अचानक घडलेल्या या प्रकारात एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवले आणि कसंबसं बसवर ताबा मिळविण्यात त्यांना यश आलं.
पुण्याहून लासलगावला निघालेल्या एसटी बसचा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक प्रवाशांना इजा पोहचली.
