भाजप नेत्याचा मोठा दावा, म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र….

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात ठाकरे बंधूंबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावेत, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. “बाळासाहेब ठाकरे जेव्हा रुग्णालयात होते तेव्ही मी त्यांना भेटायला गेलो होतो.

त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कटूता दूर करावी. दोन्ही बंधू एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांनी बाळासाहेबांचं निधन झालं होतं. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा अपूर्ण राहिली आहे.

ठाकरे बंधू एकत्र आले तर राजकारण बाजूला सोडा, पण कुटुंब म्हणून आपण एकत्र येतो तेव्हा नक्कीच ताकद वाढलेली दिसते”, असं गडकरी म्हणाले होते.

Leave a Comment