२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीस, शिंदे, पवार, ठाकरे कि थोरात, वाचा जनतेचा कौल…..

राष्ट्रवादीच्या गटाचा सरकारमध्ये समावेश झाला असल्यानं राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळं जनतेचाही मूड बदलला आहे. त्यामुळं २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा जनतेला काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समुहानं केला आहे. सकाळनं केलेल्या सर्व्हेमध्ये जनतेनं आपला कौलही दिला आहे.

सर्व्हेमध्ये किती आणि कोणाचा समावेश?

सकाळनं महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातून ७४,३३० लोकांकडून मतं जाणून घेतली. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश असून नवीन अर्थात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री म्हणून जनतेची कोणाला पसंती?

त्याचबरोबर 2024ला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना 21.9 टक्के पसंती देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांना 19.4 टक्के, अजित पवार यांना 9.5 टक्के, एकनाथ शिंदे यांना 8.5 त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना देखील 8.5 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.

अशोक चव्हाण यांना 6.6 टक्के बाळासाहेब थोरात यांना 4.2 टक्के तर जयंत पाटील यांना 3.6 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. 17.8 टक्के मतदार सांगता येत नाही असं म्हणतात.

Leave a Comment