अहमदनगर – राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी निर्माण झालेल्या गोंधळात काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार असल्याचं काॅंग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसच्या नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षात घेतले जाईल. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. तांबे यांच्यावरील निलंबनाची केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
डॉ. तांबे यांच्या प्रभावी नेतृत्वाची पक्षाला गरज असून त्यांना लवकरच सन्मानाने पक्षात घेतले जाईल. असं चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काॅंग्रेसकडेच घेणार असल्याचे काॅंग्रेस पक्षाचे शिर्डी लोकसभा निरीक्षक माजी चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले आहे.
