जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
चंद्रकांत पाटील हे राज्य शासनाच्या मराठा आरक्षण समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत. आज ते पुण्यात असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी माध्यमांना उत्तर न देता निघून गेले. त्यांच्या या कृत्यामुळे संतापलेल्या आंदोलकांच्या संतापात अधिकच भर टाकू शकते.
चंद्रकांत पाटील हे राज्य शासनाच्या मराठा आरक्षण समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जनंतर त्यांनी याबाबत काहीतरी बोलणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
