महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची तुतारी वाजली, आता गावा गावात उडणार बोकड पार्ट्यांचा धुराळा!

अहमदनगर (DSNews24/ सुनिल नजन) संपूर्ण महाराष्ट्रात रिक्त असलेल्या आणि मुदत संपलेल्या एकुण दोन हजार तिनशे एकोणसाठ (२३५९) ग्रामपंचायत निवडनुकीचा धुरळा आता उडणार आहे. अनेक दिवसांपासून गुढग्याला बाशिंग बांधून मीच भावी सरपंच म्हणून मिरवणारे हवशे नवशे गवशे आता मतदारांच्या पायावर चक्क लोटांगण घालून नवरात्रीत मताचा जोगवा मागतील आणि नवरात्र संपताच बोकड पार्ट्यांना उधाण येणार आहे.

अनेक दिवसापासून रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळीची तुतारी निवडणूक आयुक्तांनी वाजवून आता प्रत्यक्ष लढाईचा आखाडा ३ आँक्टोबर पासूनच्या आचारसंहितेने सुरु झाला आहे. आता गावागावात भाउबंदकी चांगलीच उजळून निघणार आहे.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्या आदेशानुसार दि. १६ ते २० आँक्टोबर २०२३ पर्यंत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

२३आँक्टोबर रोजी छाननी होणार आहे. दि.२५ आँक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेण्यात येतील. आणि निवडणूक बिनविरोध न झाल्यास त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. आणि ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते५.३० या वेळेत प्रत्यक्ष मतदान होणार आहे. आणि ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणीचा निकाल लागूण अनेकांच्या अंगावर गुलाल उधळला जाणार आहे. आणि फक्त नक्षलवादी भागात गोंदिया आणि गडचिरोली भागात मतमोजणी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात २९५० ग्रामपंचायत सदस्य, आणि १३० सरपंच या निवडणुकीत आपले नशीब अजमावणार आहेत. सर्व सामांन्य जनता नेमकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार यासाठी घोडा मैदान आता जवळ येउ लागले आहे.अनेक गावात वार्डा वार्डात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ मोठ्या कसरती होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आलेले भावी सरपंच पदाचे पीक ६ नोव्हेंबर रोजी गुलदस्त्यातच बंद होणार आहे. मात्र काही हसतील तर काही रडतील.

संपूर्ण निवडणूकीत ग्रामपंचायत निवडनुकी इतके गलिच्छ राजकारण कोणत्याच निवडणूकीत होत नाही हा आजपर्यंतचा ऐतिहासिक अनुभव आहे. राजकारण खेळा पण कोणाच्या ही जिवावर बेतेल असे राजकारण करू नये यातच मोठेपण सामावलेले आहे. कारण ग्रामपंचायत निवडनुकीत साम,दाम,दंड, भेद या नितीसुत्रांचा सर्रासपणे अवलंब केल्याचे दिसून येते.

Leave a Comment