राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि निवडणूक चिन्ह कोणाचे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) गेला असताना दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammed Faizal) लोकसभेतून पुन्हा अपात्र झाले आहेत. एकाच वर्षात दोन वेळा अपात्र ठरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केरळ हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने लोकसभा सचिवालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाने फैजल यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीची लढाई सुरू होण्याआधी खासदारांच्या संख्येमध्ये शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मोहम्मद फैसल यांना 2009 मधल्या एका राजकीय खूनाच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली आहे.
आधी सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती त्यावर हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली होती. नंतर या प्रकरणात पीडितांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हायकोर्टाकडे पाठवलं होतं.