कांद्याचे भाव वाढणार

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यांतशुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्यावरून राज्यात जोरदार खंडाजंगी सुरू होती. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

कांदाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव पुन्हा एकदा वर चढू लागले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात कांद्याचे दर एकाच आठवड्यात ३७ टक्के वाढले असून प्रतीनुसार किंमत ३५ ते ६० रुपये किलो असा दर झाला आहे.

कांद्याचा भाव २३ रुपये किलोवरून ३२ रुपये किलोवर गेला आहे. राज्यात झालेला कमी पाऊस आणि कांदा काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसाने यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.

यामुळे उत्पादन कमी झाली आहे तर आवक वाढली आहे. तसेच मागच्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढले असताना केंद्राने बफर स्टॉक कांदाही बाहेर काढला होता.

जेथे सरकार घाऊक बाजारात कांदा विकत आहे, तेथे कांद्याचे दर तुलनेने कमी प्रमाणात म्हणजेच ७ ते १० टक्के वाढले आहेत. याबाबत कांदा व्यापारी यांच्या म्हणण्यानुसार, यंदा खरिपातील लाल कांद्याचे पीक एक महिना उशिराने बाजारात येणार आहे. त्यामुळे भाव वाढ होत आहे.

Leave a Comment