थंडी संदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट 

Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे.

राज्यातील अनेक भागात किमान तापणान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याची इशारा हवामान विभागाने दिला आहे

मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर या शहरांमध्ये रात्रीच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे. पण मुंबईकरांना थंडीची हूडहुडी थंडीसाठी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.

तर येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर भारतातील थंड भागातून ईशान्येचे वारे येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तापमानात घट होईल.

सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी आर्द्रतेचं प्रमाण आणखी कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर पुढील आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार आहे.

Leave a Comment