पुण्यात मराठा आंदोलनाचा भडका

मराठा आंदोलनाला राज्यात हिंसक वळण मिळाले आहे. बीडमध्ये आमदार आणि नेत्यांची घरं जाळण्यात आली. त्यानंतर आता पुण्यातली आंदोलन पेटले आहे. नेहमी अपघातामुळे चर्चेत असलेल्या नवले पुलावर मराठा आंदोलकांनी टायर जाळले आहे.

मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक नवले पुलावर जमले आहे. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

पुण्यात आज नवले पुलावर मराठा आंदोलकांनी आक्रमक झाले आहे. महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मराठा आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मांडला आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर एकच वाहतूक कोंडी झाली आहे.

Leave a Comment