पुढील पाच दिवस राज्यातील हवामानाचा अंदाज काय?, वाचा….

पुढील पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवारी 9 पर्यंत ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक आहे.

अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. तर विदर्भ मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रात मात्र पहाटेचा गारवा कमी होवून दुपारचे कमाल तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता आहे. तिथे पावसाची शक्यता नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Leave a Comment