महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायतीचे निकाल रोहित पवार यांच्यासाठी धक्कादायक आहेत.
कर्जत-जामखेड मतदार संघाचे संपूर्ण निकाल जाहीर झाले आहे. रोहित पवार यांचे विरोधक राम शिंदे यांची सरशी झाली आहे. मागच्यावेळी विधानसभेला रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता.
कर्जत आणि जामखेड मिळून एकूण 9 ग्राम पंचायतीचे निकाल हाती आले आहेत. भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्याकडे 5 जागा, तर आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा आहेत. 1 ग्राम पंचायत अजित पवार गटाकडे आहे.
तर 1 स्थानिक आघाडीकडे आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता हे आकडे रोहित पवार यांच्यासाठी फारसे चांगले नाहीयत. कारण ग्रामपंचायत निवडणूक निकालातून मतदारांचा कल कुठल्या दिशेला आहे, ते कळून येतं.
