मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मीन : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.
