अहमदनगर ब्रेकिंग! एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक

एक कोटींची लाच घेऊन फरार झालेल्या अभियंत्याला अखेर अटक करण्यात आली आहे. अहमदनगर येथील एक कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेला औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. गणेश वाघ असे या आरोपीचे नाव आहे.

गणेश वाघ याला पकडण्यात अखेर लाच लुचपत विभागाला यश आलं आहे. लाच लुचपत विभागाच्या पथकानं वाघ याला अटक करून कोर्टासमोर हजर केलं असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. मागील बारा दिवसांपासून गणेश वाघ फरार होता.

लाच लुचपत विभागाच्या पथकाने वाघ याला अटक करून कोर्टासमोर हजर केले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मागील बारा दिवसांपासून शोधावर असलेल्या पथकाला गणेश वाघ याला मुंबईकडून धुळ्याकडे जात असताना अटक करण्यात यश आले.

वाघ याला जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या नायायल्यात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment