कल्याण – अहमदनगर महामार्गावर ओतूर येथील कोळमाथा येथे एसटी बस, पिकअप व दुचाकी अशा तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडलीय.
या भिषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय.
शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास ऋषिकेश संदीप वायकर (वय २२, रा हिवरे खुर्द ता.जुन्नर जि पुणे,) ओंकार दत्तात्रय गाडेकर (रा.बोरबन ता. संगमनेर) हे कल्याण दिशेने मोटरसायकलवरून जात होते.
त्यावेळी एसटी बस आळेफाट्याच्या दिशेने जात असताना ओतूर कोळमाथा येथे समोरासमोर भीषण अपघात होऊन तरुण जागीच ठार झाले. यावेळी पिकपने दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पीकअप चालकाने ब्रेक मारून पुढे जाऊन पलटी झाली.
पिकप चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
