जालन्यातील ओबीसी मेळाव्यात बोलतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर सडकून टीका केली होती.
त्यानंतर भुजबळांच्या या टीकेला जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर देत भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप केला. त्यामुळे आता दोघांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने त्यांच्याकडून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील.
शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणूस ओबीसींसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
