रोहितच्या डोळ्यात अश्रू, देशभर सन्नाटा ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच ट्विट म्हणाले

क्रिकेट वर्ल्ड कपच्या सलग 10 सामन्यांमध्ये विलक्षण प्रतिभा दाखवून खेळ केलेल्या भारतीय टीमला फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू दाटले. ते पाहून 140 कोटी जनतेच्या डोळ्यातही अश्रू आले. भारताच्या पराभवामुळे संपूर्ण देशभर रविवारी रात्री सन्नाटा होता.

पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय टीमच्या कामगिरीचे कौतुक करणारे आणि समस्त भारतीयांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ट्विट केले आहे.

संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीमने अतिशय प्रतिभाशाली खेळ दाखवत विजयी वाटचाल चालू ठेवली होती. अत्यंत खिलाडू वृत्तीने तुम्ही सर्व सामने खेळतात आणि विजयी झालात. भारताला तुम्ही गौरव मिळवून दिलात. आम्ही सर्व भारतीय आज आणि सदैव भारत टीमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास देणारे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

Leave a Comment