हवामान खात्याचा मोठा इशारा, उद्यापासून महाराष्ट्रात…

राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असल्याने थंडी कमी झाली आहे. यातच पावसला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. २३) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

आज (ता. २२) राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारताच्या दक्षिणेकडील कोमोरीन भागापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोमोरिन भागावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती तसेच तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील कमी दाबाच्या पट्ट्यात विरून गेली आहे.

हवामान होत आहे. गुरूवारी (ता. २३) सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची, तर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Leave a Comment