आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपसह शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणी केली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या १० नेत्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
– खासदार संजय राऊत यांच्याकडे लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी चिंचवड, मावळ) मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
