पुण्याला पावसाने झोडपले, पुढील काही दिवस असं असेल वातावरण?

मुंबई, नाशिकनंतर पुण्यालाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. पुण्यात आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहेय या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

या आठवड्यात अवकाळी पाऊस राज्यभर धुमाकूळ घालेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीटदेखील झाली.

पुण्यातील ग्रामीण परिसरात आंबेगाव, भोर,अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, धामणी, लोणी, वाळुंजनगर, रानमळा, लाखणगाव, काठापुर बुद्रुक,मांदळेवाडी, वडगापीर, शीरदाळे या परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला.

त्यासोबतच पुणे शहरातदेखील कात्रज, बालाजी नगर, डेक्कन, कोथरुड, शिवाजी नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यासोबतच पिंपरी चिंचवडलाही अवकाळी पावसाने झोडपले. शहराच्या अनेक भागात आज पावसाने मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार हजेरी लावली अचानक झालेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

 

पुढील काही दिवस वातावरण कसं असेल?

28 नोव्हेंबर- आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे

 

29 नोव्हेंबर-आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

30 नोव्हेंबर-रिमझिम / अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुके पडण्याची शक्यता आहे.

 

1 डिसेंबर : आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतःढगाळ राहण्याची शक्यता आहे.

 

2 डिसेंबर-आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment