विधामंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (7 डिसेंबर) सुरुवात होत आहे. त्यानिमीत्तानं सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये (Nagpur) पोहोचले आहेत.
दरम्यान, काल (बुधवारी) चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावार विरोधकांनी बहिष्कार घातला. याबबातची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
चहापानानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला.
विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली.
