राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखल्या जाणार्या या ज्येष्ठ राजकारण्याला पंतप्रधानांकडून सोशल मीडियाद्वारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना पंतप्रधानांनी एक्स पोस्ट द्वारा व्यक्त केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांच्या दीर्घकालीन राजकारणाचे कौतुक करतानाच दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीटद्वारे (एक्स) शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो. असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोदींनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
