शरद पवार यांची धनंजय मुंडेंवर टीका म्हणाले…..

शरद पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. अवकाळी झाली. पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरकायला तयार नाही, असं शरद पवार यांना विचारण्यात आलं.

त्यावर शरद पवार यांनी मश्किल टिप्पणी केली. त्याचं उत्तर मी काय देणार? एक काळ असा होता की, त्यांच्या बद्दल निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला होता. पण ते आम्हाला सोडून गायब झाले. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

शरद पवार हे चांदवडमध्ये होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीवर जोरदार टीका केली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कांद्याचं रोप कुजलेलं आहे. त्याचंही नुकसान झालं आहे.

कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी आहे. सरकारचं धोरण धरसोड असेल तर त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागते. आज ती अवस्था देशात झाली आहे. त्याची सर्वाधिक किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि सातारच्या काही भागाला हा फटका बसत आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

Leave a Comment