अहमदनगर ब्रेकिंग! ट्रक आणि कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ ठार

अहमदनगर जिल्ह्यातून एक दुख:द घटना समोर येत आहे. अहमदनगर-श्रीगोंदा रस्त्यावर महामार्गावर ट्रक आणि एसयुव्ही कारचा भीषण अपघात झााल असून या दुर्घटनेत शेख परिवारातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, 8 जण गंभीर जखमी असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर दौंड महामार्गावर आज सकाळी 11 वाजता ट्रक आणि एसयुव्ही कारचा भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी कल्याणवरून नगरकडे जात होते.

यावेळी दौंडजवळ त्यांच्या एसयुव्हीची आणि भरधाव ट्रकची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

शाबाज अजीज शेख (30) गाजी रउफ बांगी (13) व मुलगी लुजैन शोएब शेख (13) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण कल्याणमधील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींमधील काहींना दौड, तर काहींना श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment