हवामान खात्याने दिला मोठा इशारा, अहमदनगर, पुणे….

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. मागील दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

दरम्यान, पुढील २४ तासात अशीच परिस्थिती राहणार असून काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो.

Leave a Comment