पुणे ब्रेकिंग! सहाय्यक पोलीस आयुक्तांच निधन 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे अशोक धुमाळ यांचं निधन झालं आहे.

काही दिवसांपूर्वी इमारतीवरून खाली पडल्याने त्यांना भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.

घरी असताना आज त्यांची प्रकृती अस्थिर झाली होती. दुपारी उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांना आणण्यात आलं. यावेळी प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं होतं.

रात्री अशोक धुमाळ यांच्या शरीराने उपचारास प्रतिक्रिया देण्याचे बंद केले होते. रात्री ९.३० दरम्यान त्यांचं निधन झाले. अशोक धुमाळ यांच्या पश्चात पत्नी, एका मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Leave a Comment