दुचाकी चोरीला जावू नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेतली असताना चोरांच्या प्रतापाने डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे नागरिक गाडी चोरीला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करतात. यासाठी नागरिकांनी गाडीला लॉक बसवून आपली दुचाकी चोरीला जावू नये म्हणून खबरदारी घेतली.
पण दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नसल्याने चक्क दुचाकीचे चाक चोरून नेले आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील बीड बायपास रोडवरील अल्पाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने चिंतेत असताना आता गाडीचे पार्टही चोरी होत असल्याने संताप व्ययक्त केला जात आहे.
